मंदिरात प्रचारसभा घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४
Edit
बारामती :- विधानसभा निवड णुकीत प्रचारासाठी मंदि राचा वापर करण्यास प्रतिबंध करावा तसेच मंदिरामध्ये प्रचार सभा घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे पाटील यांनी केली आहे.
याबाबत ॲड.झेंडे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस.चोक्कलिंगम यांना मेल करत पत्र पाठवत ही मागणी केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आदर्श आचार संहिता ऑक्टोबरपासून लागू झाली विविध राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. धार्मिक स्थळे,चर्च,मंदिरे, प्रार्थना स्थळे याठिकाणी राजकीय पक्षांना प्रचार सभा घेण्यास बंदी असतांनाही राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांत प्रचाराच्या सभा या मंदिरांमध्ये होताना दिसत आहेत. याबाबत तत्काळ राज्यातील सर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचित करण्यात यावे. मंदिरात प्रचार सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात यावा, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबाबत संबंधित राजकीय पक्षांवर करावी, अशी मागणी झेंडे पाटील यांनी केली आहे.
याबाबत इंदापूर विधानसभा व प्रचाराच्या बैठका व ठिकाण असा सोबत दाखला जोडला आहे. तसेच याबाबत नमूद तपशील ॲड. झेंडे पाटील यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"अधिकाऱ्यांकडून दखल"
दरम्यान,या पत्राची मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.या तक्रारी बाबत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आदर्श आचार संहितेमध्ये कोण त्याही धार्मिक स्थळाचा निवड णूक प्रचारासाठी वापर करता येणार नसल्याचे नमूद आहे.तरी देखील सर्वच राजकीय पक्ष ग्रामीण मंदिरांमध्ये घेत आहेत. त्यामुळे तक्रार केल्याचे ॲड.झेंडे पाटील यांनी सांगितले.