निवडणुकीसाठी १४३४ पोलिस तैनात - उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड
शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४
Edit
बारामती :- निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानापर्यंत बारामती व इंदापूर तालुक्यात १४३४ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. निवडणूक भयमुक्त व शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिस ठाण्यांकडून पथसंचलन केले जात असून, प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत,अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभेसाठी डॉ.राठोड तर इंदापूर विधान सभेसाठी उपअधिक्षक मधुकर माटे यांना पोलिस प्रशासनाकडून पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बारामती विधानसभा मतदार संघात बारामती शहर, बारामती तालुका,माळेगाव,वडगाव निंबाळकर व सुपा तर इंदापूरमध्ये इंदापूर,वालचंदनगर, भिगवण पोलिस प्रतिबंधक कारवाईवर भर देत आहेत. या पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, पोलिस अमंलदार, गृहरक्षक दलाचे जवान यांच्याकडून गुन्हेगारीवर नियंत्रण व समूळ उच्चाटन करणे,निवडणूक कालावधीत दहशत निर्माण करणारे,वारंवार गुन्हे करणारे, अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.पोलिसांचा सक्रिय सहभाग जनतेच्या नजरेत यावा यासाठी आणि गुन्हेगारांवर जरब रहावी यासाठी सीमा सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने पथ संचलन केले जात असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
बारामती,इंदापूर तालुक्या तील एकूण बंदोबस्त
■पोलिस अंमलदार : ७८०
■होमगार्ड : ५६९
■सीमा सुरक्षा बल : ८५