दारू विक्री, जुगारी अड्डयांवर कारवाई
शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४
Edit
बारामती:- बारामती व इंदापूर तालुक्यात सीआरपीसी १०७ / बीएनएसएस १२६ प्रमाणे ५१२३ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील ४१२३ जणांनी अंतिम बॉण्ड घेतला आहे. सीआरपीसी १०९ / बीएनएसएस १२८ नुसार ९ कारवाया करण्यात आल्या आहेत. सीआरपीसी ११० / बीएनएसएस १२९ नुसार ३४७ कारवाया करण्यात आल्या असून यात २५८ जणांनी अंतिम बॉण्ड घेतला आहे.सीआरपीसी १४४ / बीएनएसएस १६३ प्रमाणे २०४ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. याशिवाय मुंबई पोलिस कायद्यानुसार २८० कारवाया करण्यात आल्या असून त्यात १३२ जणांनी अंतिम बॉण्ड घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार १८ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
बारामती व इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणूक कालावधीत अवैध दारूची विक्री होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. इंदापूर तालुक्यात आचारसंहिता लागल्यापासून आजवर ११० कारवायां करीत १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाराच्या २० केसेस करत ४१ जणांवर गुन्हा दाखल करून १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर बारामती तालुक्यात दारूबंदीच्या १०३ कारवायांत ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगाराच्या ४ कारवाया केल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.