बारामती मतदार संघ हाच माझे कुटुंब,परिवार - अजित पवार
पुढे अजित पवार म्हणाले कीआत्तापर्यंत बारामतीमध्ये नऊ हजार कोटीहून अधिकाची विकासकामे केली आहेत, या पेक्षा जास्त निधी राज्यातल्या कुठल्याच मतदार संघात आलेला नाही.33 वर्षांपासून बारामतीचा विकास हे एकमेव धेय्य आहे.असेही म्हणाले.
५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे
पक्ष म्हणून पक्षाचाही जाहीरनामा असावा म्हणून आम्ही काढला आहे. आम्ही ज्या विधानसभा लढवत आहोत, त्याचाही जाहीरनामा तयार केला आहे. आम्ही बारामतीचे व्हिजन मांडले आहे. त्याची क्लिप तुम्हाला दाखवली आहे. युतीबाबत मुख्यमंत्र्यांनी काही कार्यक्रम सांगितले आहेत. वेगळा दृष्टीकोन ठेवून जाहीरनामा केला आहे”, असे अजित पवार म्हणाले.
आम्ही ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे जाहीर करणार आहोत. बाकीचे जाहीरनामे लवकरच जाहीर करणार आहोत. एक पुस्तिकाही आम्ही प्रकाशित करत आहोत. आम्ही प्रत्येक भागाच्या गरजा लक्षात घेऊन काम करत आहोत. आमदारांच्या कामगिरीबद्दल आणि उमेदवार पाच वर्षात कोणती कामे करणार आहेत याची माहिती दिल्याचे, अजित पवार यांनी सांगितले.
बारामतीकरांना आश्वासने
बारामतीला कुस्तीची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे बारामतीमध्ये महाराष्ट्रातील पहिली जागतिक दर्जाची क्रीडा आकादमी उभी करणार अशी घोषणा अजित पवारांनी केली. या अकादमीमध्ये बॉक्सिग, कुस्ती, भालाफेक, शुटींग, पोहणे इत्यादी प्रकारचे खेळ शिकवून खेळाडू तयार केले जातील. तसेच यामध्ये आधुनिक सुविधा, वैधानिक कोचिंग आणि प्रशिक्षण महाराष्ट्रातील खेळाडूंना दिले जाईल, असेही अजित पवार म्हणाले.
बारामतीतील शेतकऱ्यांसाठी पाच हजार कृषी अधारित फूड प्रोसेसिंग युनिटचे एक नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. यासोबतच बारामतीमध्ये लवकरच एक लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येईल, यामुळे स्थानिकांना आजूबाजूच्या नागरिकांना रोजगार मिळेल.तसेच. बारामतीला पहिले सौर ऊर्जा असलेलं शहर बनवणार आहे. बारामतीत कॅन्सरसाठी कर्करोग रुग्णालय उभारणार आहे. कर्करोगासाठी पुणे आणि मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, यावेळी अजित पवार यांनी 9861717171 या टोल फ्री नंबरवर मतदारांना त्यांचा जाहीरनामा एकता येणार आहे असेही अजित पवार म्हणाले.