“घड्याळा”चा गजर करून अजितदादांना विक्रमी मताधिक्य देऊ,” - खोपवाडी ग्रामस्थांची ग्वाही
बारामती: अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ सौ. सुनेत्रा पवार यांनी खोपवाडी ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी “दादांचा सत्तेतील सहभाग हा बारामतीच्या विकासाला पुन्हा सक्रिय करणारा ठरला. ते सत्तेत असल्यानेच बारामती तालुक्याला ते ९ हजार कोटींचा निधी देऊ शकले. त्यातून भले झाले ते जनतेचे. जानाई शिरसार्ईचे आपल्या जगण्याशी संबधित असलेल्या योजनेचे उदाहरण सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे जनतेचा विचार करणाऱ्या अजितदादांचा विचार करण्याची वेळ आता जनतेची आहे. त्याच विचारातून खोपवाडी गाव पूर्ण ताकदीने “घड्याळा”चा गजर करून अजितदादांना विक्रमी मताधिक्य देईल,” अशी ग्वाही खोपवाडी ग्रामस्थांनी दिली.
यावेळी बोलताना सौ. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादा यांनी जनतेला केंद्रबिंदू मानून विकासाला प्राधान्य दिले. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी प्रत्येक क्षेत्रात झालेली कामे सर्वांसमोर आहेत. त्याला साक्षी ठेऊन “घड्याळ” चिन्हासमोरील बटन दाबून अजितदादांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामस्थांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.