ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदासाठी केविलवाणे प्रयत्न उध्दवजींना पराजयाकडे घेऊन गेले?
रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४
Edit
मुंबई:- शिवसेना कोणाची ? एकनाथ शिंदे यांची की,हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उध्दव ठाकरे यांची? याचा निर्णय जनतेने विधानसभा निवडणुकीत लावला आहे. राजकीय पक्ष म्हणजे वारसा हक्क नाही! एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून भरघोस कामे केली.त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची वाहवा करून त्यांना भरघोस मतदान केले!
उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद हवे होते,त्यासाठी उध्दवजी ठाकरेंनी वारंवार बैठका घेतल्या. मुख्यमंत्री पदाकरिता पार दिल्ली गाठली.हे जनतेला आवडले नाही.त्याचे पडसाद मतपेटीत उतरलेले दिसतात. उध्दवजींच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा खूप कमी मतदान मिळाले आहे.
उध्दवजी ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले. कारण उध्दवजी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले होते. कोरोनाच्या काळात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि जवळ जवळ एक वर्षभर ते 'मातोश्री' वर अडकून पडले होते,तरीही त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले नाही किंवा दुसऱ्या कोणावर सोपविले नाही,ही बाबसुध्दा जनतेला खटकली.
ठाकरे घराणे स्वतःच्या मर्जी प्रमाणे चालते,पण उध्दवजी ठाकरे नेहमी तेच करीत आले जे शरदपवार यांनी सुचविले.त्याच्या चर्चा महाराष्ट्रभर सर्वत्र झाल्या, गावा गावांत ही चर्चा होती. त्याचा हा फटका बसला आहे.