महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी करू नका -- अजित पवार

महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी करू नका -- अजित पवार

 


योगी आदित्यनाथ यांच्या "बटेंगे तो कटेंगे" घोषणेला नाव न घेतां अजित पवारांचे जोरदार प्रत्त्युतर 

पुणे  :- महाराष्ट्र हा शिव,शाहू, फुले,आंबेडकर यांची विचारधारा मानणारा आहे.इतर राज्यांची तुलना महाराष्ट्राशी करू नका. इथल्या जनतेला हे अजिबात आवडत नाही.राज्यातील जनतेने सातत्याने जातीय सलोखा ठेव ण्याचा प्रयत्न केला आहे,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता टीका केली.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी बटेंगे तो कटेंगे असे सांगून हिदुत्वाचा गजर करणाऱ्या भाजपाला मते दिली पाहिजेत असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते.याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता टीका केली.
      
ते म्हणालेकी,शाहू, म.फुले, डाॅ.आंबेडकरांची विचारधारा अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन जाण्याची आहे. बाहेरचे लोक येऊन त्यांचे विचार बोलून जातात.परंतु महाराष्ट्राने हे कधीही मान्य केलेले नाही. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीचा इतिहास असा राहिला असल्याचीही आठवण त्यांनी या वेळी करून दिली.
     
दरम्यान सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्यावर अजित पवार म्हणा ले,खोत यांनी केलेले वक्तव्य निषे धार्ह आहे.त्यांना फोन करून शरद पवार यांच्या बद्दल केलेले वक्तव्य आवडलेले नसल्याचे सांगून अशा प्रकारची टीका करणे बंद करा आणि त्यांच्या बाबत पुन्हां कधी बोलू नका असे सांगितले.देशभरातील अनेक नेते महाराष्ट्रात येतील,त्यांनी सुद्धा वैयक्तिक कुणाबद्दल न बोलता आपली‍ भूमिका मांडायला हवी. मत मतांतर मांडत असतांना ताळमेळ असायला हवा.ज्येष्ठ नेत्यांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील जनता सहन करत नाही.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृते राजकारण कसे करायचे,आरोप प्रत्यारोप होत असतांना त्याला कसे उत्तर द्यायचे हे त्यांनी शिकवले आहे. त्यानंतर हीच पद्धत वसंतराव नाईक,वसंतदादा पाटील आणि शरद पवार,विलासराव देशमुख यांनी सुरू ठेवली असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.