निवडणूक आयोगानं रश्मी शुक्लांना हटवले ; विवेक फणसाळकर पोलीसांचे नवे बॉस केले

निवडणूक आयोगानं रश्मी शुक्लांना हटवले ; विवेक फणसाळकर पोलीसांचे नवे बॉस केले

 


विधानसभा  निवडणुका तोंडावर असतांना निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.त्यांना हटविल्या नंतर आतां त्यांच्या जागी विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा आणि संजीव कुमार सिंघल डी.जी.पी (अँटी करप्शन ब्युरो ) या तीन नावांची विशेष चर्चा होती.मात्र यामधील  विवेक फणसाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त असलेले  विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्य पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.     

मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड होण्याआधी महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्या ण महामंडळाचे संचालक होते. रश्मी शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झालेली असतांनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे आग्रहा स्तव आणि युती सरकारने जाने वारी २०२६ पर्यंत त्यांना नियम बाह्य बढती दिली होती,असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.तसेचं नेमणुकी पासूनच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत  वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमका वण्याची कामे त्यांनी केली आहेत,असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता. 

असाच आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा होता.देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पक्षासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर रश्मी शुक्ला यांनी या पूर्वीही केला आहे.असा आरोप होता.यात सन २०१९ पासूनचं विरोधकांच्या फोन टॅपिंगच प्रकरणही होतं.