हर्षवर्धन पाटील हे जबाबदार नेते - शर्मिला पवार
शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४
Edit
इंदापूर - ( तानाजी काळे): महाराष्ट्राची सर्व क्षेत्रांत गेल्या काही वर्षांमध्ये विस्कटलेली घडी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने हर्षवर्धन पाटील योग्य प्रकारे बसवतील.हर्षवर्धन पाटील यांनी आजपर्यंत अत्यंत जबाबदारीने कामे पार पाडलेली आहेत.
पाटील यांची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केली आहे.ते जे निर्णय घेतात तो योग्यच निर्णय असतो. श्री.पाटील यांना विजयी करा असे आवाहन शरयूफाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.
त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता पुढे म्हणाल्या साहेबांनी ज्यांना उभे केले,अनेक पदे दिली,मंत्री केले,मान सन्मान दिला,त्यांनीच ऐनवेळी शरद पवार यांना अंतर दिले.परंतु महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता कदापिही शरद पवार व त्यांच्या विचाराच्या माणसांना अंतर देणार नाही.असा विश्वास मला वाटतो.
महाविकास आघाडीचे उमेद वार हर्षवर्धन पाटील यांचे प्रचार दौऱ्यातील शिंदेवाडी,बोरी,सपक ळवाडी आदि सभांमध्ये केले. यावेळी तेजसिंह पाटील,सागर मिसाळ,अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील,सुभाषराव शिंदे,बावड्याचे सरपंच गिरमे हे उपस्थित होते .
शर्मिला पवार पुढे म्हणाल्या की,लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे मागील काळामध्ये शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे शेती क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे.सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातले आहे.दुधाला भाव नाही.शेतमाला ला भाव नाही. एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातो. तर दुसरीकडे लाडक्या दाजीच्या खिशातून विविध कररूपाने मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गोळा केला जात आहे.महागाई भरम साठ वाढलेली आहे.सर्व सामान्य जनता वाढत्या महागाईने मेटाकुटीला आली आहे.या सर्व प्रश्नांचे उत्तरे व निपटारा महा विकास आघाडीच्या सरकारला आगामी काळामध्ये करावा लागणार आहे. त्यासाठी इंदापूर सह संपूर्ण राज्यातील मतदारांनी महा आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा.असे आवाहनही यावेळी त्यांनी केले .
मागील काळामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शरयू फाउंडेशनने अडीच हजार विहिरी मोफत खोदून देण्याचे काम पाच तालुक्यांमध्ये केले.दीडशे गावातील ओढ्या-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून जलसंधारणाची कामे करण्याचा प्रयत्न केला. आगामी काळामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, बेरोजगारी असेल,महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम असेल या सर्व कामांमध्ये महा विकास आघाडी सरकार अग्रेसर राहील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी तेजसिंह पाटील, अंकिता पाटील-ठाकरे,सागर मिसाळ,बाबा खारतोडे,सचिन वाघमोडे आदींची प्रासंगिक भाषणे झाली.