नागरिकांनो सावधान रहा, त्या महिलांना माहिती देऊ नका; निवडणूक काळात बेकायदेशीर सर्व्हे सुरू ?

नागरिकांनो सावधान रहा, त्या महिलांना माहिती देऊ नका; निवडणूक काळात बेकायदेशीर सर्व्हे सुरू ?

 

बारामती :- बारामती आणि परिसरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून कांही महिला सर्व्हे करण्यासाठी दारोदार फिरत आहेत आणि त्या महिलांचे फोटो काढीत आहेत, तुमची गोपनीय माहिती बोलता बोलतां तुमच्या कडून काढून घेत आहेत. तेंव्हा नागरिकानो सावधान रहा! आणि तुमची कोणतीही,कसलीच माहिती त्यांना खातरजमा केल्याशिवाय बिलकुल देऊ नका.

    महाराष्ट्रात सध्या निवडणुकां चा माहोल असून प्रमुख राज कीय पक्षांच्या  प्रचार,सभा, निवडणूक दौरे राज्यात सर्वत्र सुरू आहेत.गावभेटी सुरु आहेत,त्यामुळे सध्या कोणताही सर्व्हे राज्यात सुरु नाही,अशी माहिती शासन स्तरावरून मिळाली आहे. त्यामुळे शासकीय योजनांची माहिती घेण्याच्या नावावरून आणि कारणावरून कोणताही अनुचित,व नुकसानीचा प्रकार घडु शकतो. तेंव्हां संभाव्य नुकसान टाळण्यासठी कोणीही कोणालाच कसलीही माहिती अजिबात देऊ नका.तशी माहिती सांगायला अगर विचारण्यासाठी कोणीही आले तर योजनेची बेकायदा माहिती गोळा करीत असल्याने त्या महिलांना कसलीच माहिती न देतां,न सांगता थेट पोलिसांच्या हवाली करा.

   गावागावात  सध्या एक ना अनेक प्रकारे,विविध क्षेत्रातुन नागरिकांची विविध कारणांनी लुटमार होत असते.त्यामुळे अशी खाजगी माहिती मागण्याचा, घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.तेंव्हां जागे व्हा व जागरूक रहा.आणि कोणालाही कसलीही माहिती देऊ नका.

   या बेकायदेशीर होत असलेल्या सर्व्हे प्रकरणी नागरिक संत्रस्त व संतप्त झाले असून प्रशासनाने वेळीच त्या सर्व्हे करणाऱ्या महि लांना प्रतिबंध करावा अन्यथा संतप्त नागरिकांकडून देखील ऐन निवडणूक काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारत येत नाही.