गार येथील कार्यकर्त्याचा आमदार राहुल कुल यांचा विजयाचा जल्लोष करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गार येथील कार्यकर्त्याचा आमदार राहुल कुल यांचा विजयाचा जल्लोष करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 


दौंड:- अंकुश ऊर्फ बाळासाहेब रामराव भोसले ( वय ६२, रा. गार ता. दौंड जि. पुणे ) यांचा शनिवारी ( दि.२३) ह्रदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, विधानसभा मतदारसंघाचा मतमोजणी सुरू असताना भाजपचे उमेदवार राहुल कुल हे मतमोजणीत आघाडीवर होते. त्यामुळे तालुक्यातील कुल समर्थक हे दौंड शहरातील शासकीय गोदाम नगर मोरी याठिकाणी विजयाचा जल्लोष करण्यासाठी दाखल झाले होते.

यावेळी गार येथील अंकुश ऊर्फ बाळासाहेब भोसले हे आमदार कुल यांच्या विजयाचा जल्लोष करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने दौंड येथील खाजगी रुग्णालय दाखल केले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गार परिसरात शोककळा पसरली आहे.