जनतेचे प्रेम हीच अजितदादांची ऊर्जा -- सुनेत्रा पवार
शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४
Edit
बारामती :- अजितदादा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने माऊलीनगर,कृषीदेवतानगर येथील रहिवाशांची भेट घेऊन मतदान यंत्रावर क्र.१ वर असणाऱ्या “घड्याळ” या चिन्हा समोरील बटन दाबून अजितदादा पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या परिसराची,इथल्या लोकांची ओळख फक्त अजितदादा यांच्याशी आहे.आजपर्यंत इथली जी जी काम मार्गी लागली ती अजितदादा यांच्या मुळेच मार्गी लागले आहेत.अनेकांच्या व्यक्ति गत अडचणी,समस्या देखील त्यांनी आपल्या समजून घेवून सोडवल्या आहेत.असे असतांना अजितदादा यांच्या प्रचारासाठी इथे यायची देखील आवश्यकता नव्हती,असे या परिसरातील नागरिक,मतदार म्हणत होते.
जनतेतून व्यक्त झालेल्या या आपुलकीच्या भावनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.जनतेचे हेच प्रेम अजितदादा यांची ऊर्जा असल्याचे सांगून त्यांनी दिलेल्या या पाठिंब्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.