पुढील तीन ते चार दिवसात होणार शपथविधी; उद्या दिल्लीत सत्तास्थापनेबाबत बैठक - अजित पवार

पुढील तीन ते चार दिवसात होणार शपथविधी; उद्या दिल्लीत सत्तास्थापनेबाबत बैठक - अजित पवार

 


छ. संभाजीनगर:- आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अजितदादांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महायुतीला दिलेल्या यशाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानताना सत्ता स्थापनेबाबत उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीसाठी अजितदादांसह एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहे.

दिल्लीत होणाऱ्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह मंत्रीमंडळाबाबत चर्चा होणार आहे. खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचं सरकार सत्तेत येणार असून उद्याच्या बैठकीनंतर त्याला अंतिम स्वरूप येईल असंही अजितदादांनी सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्राच्या नवीन सरकारच्या शपथविधीबाबत विचारलं असता येत्या तीन ते चार दिवसात म्हणजेच ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल असे संकेत अजितदादांनी दिले आहेत.