साहेबांनी निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार - अजित पवार

साहेबांनी निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार - अजित पवार

 


बारामती: बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे. दीड वर्षानंतर साहेबांनी निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार. मी माझी फुशारकी सांगत नाही. पण दुसरा नवखा बघू शकतो का? असा सवाल केला आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज लढतींमध्ये बारामतीचाही समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाकडून त्यांचे नातू युगेंद्र पवार रिंगणात आहेत. तसं पाहायला गेलं तर ही लढत शरद पवार आणि अजित पवारांमध्येच आहे. शरद पवारांनी आपल्या उमेदवारांना जिंकूण आणण्यासाठी प्रचारसभांचा धडाका लावलाय. आता अजित पवार बारामती तालुका दौऱ्यावर असून मतदारांची भेट घेत आहेत. यादरम्यान अजित पवारांनी मोठे विधान केले आहे.

बारामतीतील एका सभेत पवार साहेब म्हणाले की, पुढील दीड वर्षात मी थांबणार आहे. व इतरांनी सर्व बघायचं. मग मला सांगा दीड वर्षानंतर साहेबांनी निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार. मी माझी फुशारकी सांगत नाही. पण दुसरा नवखा बघू शकतो का? त्याला याच्यातलं काही माहिती आहे का? तो शिकेल नाही असं नाही. आम्हीही आईच्या पोटातून शिकून आलेलो नाही, काम करावं लागतं. काही वर्षे लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. वडगाव निंबाळकर या ठिकाणी पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.