“होय, माझ्या दादावर अन्याय झाला…” अजित पवार यांच्या मातोश्रींचं भावनिक पत्र
बारामती – होय, माझ्या दादावर अन्याय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पत्राद्वारे सांगता सभेत खंत व्यक्त केली. अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी पत्राचे वाचन केले यावेळी आशाताई पवार उपस्थित होत्या.
पत्रात नेमकं काय म्हणाल्या आशाताई पवार
एक आई म्हणून मी अजितच भाषण ऐकण्यासाठी आली आहे. एक आई म्हणून एक गोष्ट मला तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे की, अजित लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठीच सतत धडपडत असतो.
लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो.
एक आई म्हणून माझं दुःख मलाच माहिती आहे की, अजितवर काय अन्याय झालाय आणि तो काय सोसतोय हे मला माहित आहे.
आजही कुटूंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळ सहन करतोय. एवढं मोठ मन त्याच आहे. तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभ रहावे एवढीच तुमच्या अजितच्या आईची तुम्हाला विनंती.