राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५ हजार ९३७ खटले निकाली; २६ कोटी ८५ लाख १ हजार १६ रूपयांचीं वसुली
सोमवार, १६ डिसेंबर, २०२४
Edit
बारामती:- बारामतीच्या राष्ट्रीय लोक अदा लती मध्ये ५९३७ खटले निकाली निघाले असून २६ कोटी ८५लाख १ हजार १६ रुपयांची वसुली झाली.
शनिवार दि.१४ रोजी बारा मतीचे जिल्हा न्यायाधीश श्री. व्ही.सी.बर्डे यांचे अध्यक्षतेखाली बारामती वकील संघटना व विधी सेवा समिती यांचे संयुक्तविद्यमाने हे राष्ट्रीय लोक न्यायालय पार पडले.
या लोक अदालतीमध्ये बँक वसुलीच्या दाखलपूर्व व दाखल अशी २१३ प्रकरणे निकाली निघाली.त्यामध्ये १३ कोटी १३ लाख ८ हजार ४७ रुपयांची वसुली झाली.मोटार अपघात चे एकूण ३५ खटले निकाली निघाले त्यात ४ कोटी ७८ लाख ६ हजार ९५८ रुपयांची वसुली झाली.महसूल विभागाचे ३हजार १८१ खटले निकाली निघाले. त्यात १ कोटी ११ लाख ६ हजार ३३८ रुपयांची वसुली झाली तर पाणीपुरवठा बिलासंबंधी २ हजार ३८२ खटल्यात २ कोटी १८ लाख ९ हजार ३८२ रुपयांची वसुली झाली.एकूण ५ हजार ९३७ खटल्यात २६ कोटी ८५ लाख १ हजार १६ रुपयांची वसुली या राष्ट्रीय लोक न्याया लयात झाली.
बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रभाकर बर्डे व उपाध्यक्ष ॲड.सचिन कोकणे यांचेसह वकील संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
जिल्हा न्यायाधीश१ श्री. व्ही.सी बर्डे,तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.आर. पाटील,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आय.ए.आर.मरछिया,एन. आर.वानखेडे,प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश ओ.एम.माळी,व्ही. व्ही.देशमुख इत्यादींनी पॅनलजज म्हणून काम पाहिले.तर समन्वय क म्हणून मिलिंद देऊळगावकर यानी काम पाहिले.
नियमीत होणाऱ्या लोकन्याया लयात जास्तीत जास्त पक्षकारां नी आपले दावे समन्वयाने सोडव ल्यास अमूल्य वेळेबरोबर पैशाची देखील बचत होते असे अनेक फायदे होतात त्यामुळे पक्षकारांनी यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे मत यावेळी जिल्हान्यायाधीश व्ही.सी. बर्डे यानी व्यक्त केले.