अमाप उत्साहात बारामती पॉवर मॅरेथॉन संपन्न
सोमवार, १६ डिसेंबर, २०२४
Edit
बारामती दि.१५:- (प्रतिनिधी) बारामतीची प्रसन्न गुलाबी थंडीने सजलेली पहाट, हिरवाई नटलेले सुंदर रस्ते, एसआरपीएफ च्या शिस्तबद्ध बँड पथकाने रनर्सचे फिनिश पॉईंटवर केलेले अविस्मरणीय स्वागत आणि बारामतीचा विकास पॅटर्न न्याहाळत रनर्सने विक्रमी वेळेत साधलेली दौड यांमुळे बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला.
वर्ल्ड ऍथलेटिक असोसिएशनची मान्यतेने आणि तालुका स्तरावर आंतरराष्ट्रीय मानकांच्या दृष्टीने संपन्न होणारी बारामती पॉवर मॅरेथॉन ही कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅरॅथॉनसाठी पात्रता निकष गणली जाते. त्यामुळे देशभरातून अनेक ख्यातनाम रनर्स या मॅरेथॉन मध्ये सहभागी होत असतात. मॅरेथॉनचे उत्कृष्ट नियोजन , ट्रॅक वर असणारी हायड्रेशनची आणि एनर्जी पॉईंटची उत्तम व्यवस्था , मैदानावर जागोजागी उभारलेले सेल्फी पॉईंट आणि फोटोसेशन बूथ , चिंकाराच्या ब्रँडिंगने साधलेले वातावरण यांमुळे प्रोफेशनल रनर्ससोबतच यंदा बारामती आणि परिसरातील आरोग्यस्पर्धकांची संख्या वाढलेली बघायला मिळाली. एकूण २८०० हुन अधिक रनर्स मॅरेथॉन मध्ये विविध रनिंग कॅटेगरीसाठी सहभागी झाले होते.
बारामती रेल्वे स्टेशन ग्राउंड येथे विविध ०५ कॅटेगरी मध्ये ही मॅरेथॉन पार पडली.तत्पूर्वी १३ आणि १४ डिसेंबर रोजी स्पोर्ट्स एक्स्पो आणि मॅरेथॉनच्या पूर्वसंध्येला रॉक बँड परफॉर्मन्स बारामती मध्ये प्रथमच पार पडला. १५ डिसेंबर , मॅरेथॉनच्या दिवशी ४२ km चा पहिला फ्लॅग ऑफ पहाटे ४:०० वाजता , २१ km चा फ्लॅग ऑफ सकाळी ६:०० वाजता , १० km चा फ्लॅग ऑफ सकाळी ०६:१५ वाजता तर , ०५ Km आणि ०३ km चा फ्लॅग ऑफ सकाळी ०७:१५ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार,खासदार सौ.सुनेत्राताई अजितदादा पवार,पुनीत बालन ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योजक पुनीत बालन,युवा नेते पार्थदादा पवार, अभिनेता जॅकी भगनानी, सौ.जान्हवी पुनीत बालन-धारिवाल,आणि अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.
सकाळी ८:०० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण संपन्न झाले. ४२ किमी, २१ किमी, १० किमी, या रनिंग कॅटेगरी मधील , प्रथम तीन विजेते आणि मॅरेथॉन मध्ये सहभागी टॉप ५ क्लब्स आणि स्कुल रन मध्ये जास्तीत जास्त संख्येने स्पर्धक देणाऱ्या टॉप ०३ स्कुलला सुद्धा रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये ४२ किमी पुरुष (प्रथम -लते चांदेव , द्वितीय - गायकवाड दयाराम , तृतीय - पंकज सिंग ) ४२ किमी स्त्री (प्रथम -मनीषा जोशी , द्वितीय - उर्मिला बने , तृतीय - सिंधू उमेश) २१ किमी पुरुष (प्रथम -धोंडिबा गिरदवा , द्वितीय - आबासाहेब राऊत , तृतीय -डॉ.मयूर फरांदे ) २१ किमी स्त्री (प्रथम -शीतल तांबे , द्वितीय - शिवानी चौरसिया , तृतीय - स्मिता शिंदे ) १० किमी पुरुष (प्रथम -अमूल अमुने , द्वितीय -सुजल सावंत , तृतीय - आर्यन पवार ) १० किमी स्त्री (प्रथम -आरती बाबर , द्वितीय - सोनाली मटने , तृतीय -रोशनी निषाद )
आणि टॉप ५ क्लब्स प्रथम - फलटण रनर्स , द्वितीय - सनराईज सायकल ग्रुप , तृतीय - एन्व्हायरमेंटल हेल्थ क्लब , चतुर्थ - बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन , पाचवा क्रमांक -सासवड रनर्स या क्लबला तसेच , टॉप ०३ स्कूल प्रथम - एस.व्ही.पी.एम. शारदानगर , द्वितीय - विनोद कुमार गुजर विद्यप्रतिष्ठान स्कूल , तृतीय -कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन स्कूल यांना गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक - अध्यक्ष आयर्नमॅन सतिश ननवरे म्हणाले , "पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसऱ्या पर्वाला रनर्सने दिलेला प्रतिसाद आम्हा सर्व आयोजकांचा उत्साह वाढविणारा आहे. बारामती चे संपूर्ण देशात एक वेगळे वलय आहे. बारामतीचा सर्वांगीण विकास हा देशात नेहमीच चर्चेचा विषय असतो. मॅरेथॉन द्वारे देशभरातील रनर्स येऊन बारामतीचा हा विकासाचा पॅटर्न प्रत्यक्ष अनुभवतात ही निश्चितच समाधानाची बाब वाटते. बारामती पॉवर मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी ज्यांचे पाठबळ लाभले ते , पुनीत बालन सर , सर्वच प्रमुख प्रायोजक आणि माझे आधारस्तंभ राज्याचे कार्यशील उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मॅरेथॉनचे पुढील तिसरे पर्व २ नोव्हेंबर २०२५ ला संपन्न होणार असून , पुढील पर्वाला आपण उदंड प्रतिसाद द्याल असा विश्वास वाटतो."
स्पर्धकांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार म्हणाले , "बारामतीची प्रगती चहुबाजूंनी होत असताना , त्याला क्रीडा क्षेत्र देखील अपवाद नाही. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी मॅरेथॉन सारख्या स्पर्धा महत्वाच्या ठरतात आणि या प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनात पुनीत बालन आणि त्यांच्या सौभाग्यवती जान्हवी या नेहमीच आघाडीवर असतात. सतिश ननवरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेऊन ही मॅरेथॉन यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन."
खासदार सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या , "मॅरेथॉन आणि त्याचे आयोजन करणे हे निश्चितच आव्हानात्मक काम आहे. बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्यांनी हे आव्हान लीलया पेलले आहे. आम्हाला आयोजकांनी ०६:०० वाजताची वेळ दिली होती. मात्र मा.दादा आणि आम्ही अर्धा तास वेळेआधीच या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे वेळेवर चालणारी बारामती आणि फिटनेस प्रगतीच्या दिशेने धावणारी बारामती यांचा अनोखा मिलाफ आपल्याला पाहायला मिळाला."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर (मामा) जगताप यांनी केले, तर आभार विश्वस्त प्रशांत (नाना) सातव यांनी मानले. याप्रसंगी , बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे विश्वस्त रोहित सराफ , आर.एन.(बाप्पू) शिंदे , राजू भिलारे , डॉ.हेमंत मगर , परमेश पारेख , प्रशांत नाना सातव , तुषार चव्हाण (IFS) , डॉ.रमेश भोईटे , अल्ट्रामॅन दशरथ जाधव , गिरीश कोंढारे , सादिक हिरोली , उस्मान उगाळे , रविंद्र दादा थोरात , सपना ननवरे यांच्यासह सदस्य आणि आरोग्यप्रेमी बारामतीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.