मुंबईतला तो शापित बंगला, ज्यानं रातोरात बनवलं सुपरस्टार अन् झटक्यात हिरावलं स्टारडम, उद्ध्वस्त झाले 3 जीवन

मुंबईतला तो शापित बंगला, ज्यानं रातोरात बनवलं सुपरस्टार अन् झटक्यात हिरावलं स्टारडम, उद्ध्वस्त झाले 3 जीवन

 


60 च्या दशकाच्या सुरुवातीला राजेंद्र कुमार यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळू लागली. राजेंद्र कुमार यांनी त्यांच्या एका चित्रपटाची फी न घेता त्याबदल्यात दिग्दर्शकाकडून मुंबईतील कार्टर रोडवर बंगला विकत घेतला होता. या बंगल्यात आल्यानंतर त्यांचे नशीब उजळले. राजेश खन्ना यांच्या बाबतीतही असेच घडले. एवढेच नाही तर या बंगल्यातून भारत भूषण यांचेही नशीब चमकले. नंतर तिघांनीही याच बंगल्यात विध्वंसही पाहिला.

राजेंद्र कुमार यांनी 1957 मध्ये 'मदर इंडिया' आणि 1959 मध्ये 'धूल का फूल' सारखे चित्रपट केल्यानंतर हा बंगला खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. एका चित्रपटाच्या फीच्या बदल्यात त्यांनी दिग्दर्शकाकडून हा बंगला विकत घेतला होता. त्या काळात लोक या बंगल्याला भूत बंगला म्हणायचे. पण राजेंद्र कुमार यांनी या बंगल्याचे नाव त्यांच्या मुलीच्या नावावरून 'डिंपल' ठेवले आणि पूजा करून तेथे राहू लागले.

भारत भूषण उद्ध्वस्त झाले राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद या बंगल्याबद्दल तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतील. हा बंगला सर्वप्रथम हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज भारत भूषण यांनी विकत घेतला होता. कार्टर रोडवर अरबी समुद्राशेजारी हा बंगला बांधला आहे. या बंगल्यावर आल्यानंतर त्यांनी 'बैजू बावरा', 'मिर्झा गालिब', 'गेटवे ऑफ इंडिया', 'बरसात की रात' अशा अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. पण या बंगल्यात आल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले, भारत भूषणचे स्टारडम संपले आणि ते कर्जात बुडाले. त्यांनी हा बंगला विकल्यानंतर हा बंगला एखाद्या भूतबंगल्यासारखा दिसू लागला आणि लोक त्याला शापित समजू लागले.

1960 मध्ये राजेंद्र कुमार यांना या बंगल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तो विकत घेतला. बंगल्यात राहायला गेल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी 1968-69 मध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण लवकरच त्यांचा काळ बदलू लागला आणि त्यांचे चित्रपटही फ्लॉप होऊ लागले. त्यांनी आपल्या मुलासोबत अनेक चित्रपटांची निर्मिती केली, त्यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही. या बंगल्यावर आल्यानंतर त्यांच्यावर आर्थिक संकटही आले. नंतर राजेंद्र कुमार यांनी हा बंगला राजेश खन्ना यांना विकला.

राजेश खन्ना यांनीही आपले स्टारडम गमावले

राजेश खन्ना यांनी करिअरच्या सुरुवातीला सलग 15 हिट चित्रपट देऊन आपला प्रभाव निर्माण केला होता. राजेश खन्ना यांना हा बंगला खरेदी केल्यामुळे हे स्टारडम मिळाल्याची चर्चा त्यावेळी पसरली होती. हा तोच बंगला होता जो त्यांनी राजेंद्र कुमार यांच्याकडून विकत घेतला होता. राजेंद्र कुमार यांनी हा बंगला राजेश खन्ना यांना 60 हजार रुपयांना विकला होता. राजेश खन्ना यांनी या बंगल्याचे 'डिंपल'वरून 'आशीर्वाद' असे ठेवले. या बंगल्यात आल्यानंतर ते स्टार झाले. त्यांचे लग्नही याच बंगल्यात झाले आणि इथेच त्यांच्या स्टारडमची घसरण पाहायला मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेश खन्ना यांचा हा बंगला उद्योगपती शशी करण शेट्टी यांनी 2014 मध्ये 90 कोटी रुपयांना खरेदी केला.