अनधिकृत वीटभट्टयांवर कारवाईचे प्रशासनाचे आदेश

अनधिकृत वीटभट्टयांवर कारवाईचे प्रशासनाचे आदेश

 


बारामती:- बारामती शहर, परिसरात आणि तालुक्यातील अनधिकृतरित्या सुरु असलेल्या वीटभट्टया तात्काळ बंद करून महाराष्ट्र जमीन महसूल अधि नियम १९६६ नुसार कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दामोदरे यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना केली, त्यावर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत.
     
बारामतीतील अनधिकृत वीट भट्टयांवर कारवाईची मागणी या पूर्वीच करण्यात आली आहे,  त्याची दखल घेत प्रांताधिकारी नावडकर यांनी तहसीलदारांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.प्रांताधिकाऱ्यांनी तहसील दार यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने बेकायदा वीट भट्टी चालवीत असणाऱ्यांची धावपळ सुरू झाली असून शिल्लक माल विकण्यात भट्टी चालक मशगुल आहेत, त्यामुळे प्रशासनाने वेळीच कठोर कार्य वाही करण्याची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.     
      
बारामती व परिसरात १२७ अनाधिकृत वीटभट्टया यांना आपल्या कार्यालयातून व प्रदूषण नियामक मंडळ यांनी कसल्याही प्रकारची परवानगी देलेली नसताना या वीटभट्टया अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरूच आहेत.या विटभट्टया गावतलाठी, मंडळ अधिकारी यांच्या संगनम ताने आर्थिक हितसंबंधासाठी बिनदिक्कत सुरू आहेत. वीट भट्टयांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची खाते निहाय चौकशी करून संबधितां वर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे. वीटभट्टयांसाठी लागणारी माती जिल्ह्यासीमाच्या बाहेरून आणून तसेच वीजभट्टयांना लागणाऱ्या मातीचा साठा केला जात आहे, तसेच त्या मातीची अनधिकृतपणे वाहतूक देखील केली जात आहे. हे सर्व शासनाचा महसूल बुडवून केले जात आहे. ज्या ठिकाणी सध्या या वीटभट्टया सुरु आहेत, त्या वीटभट्टया चालकांच्या जमिनीवर शासकीय बोजा चढवण्याची मागणी देखील दामोदरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बारामती शहर  तालुक्यात शासकीय आकड्यानुसार साधारण सव्वाशेच्या आसपास कार्यरत वीटभट्टी आहेत.सध्या बारामतीचा झपाट्याने होत अस लेला विकास तसेच नागरीकरण आणि बांधकाम याचा विचार करता या व्यवसायातून एकट्या बारामतीत हजारो कोटींचे व्यवहार होतो,मात्र तो सर्व व्यवहार बेकायदा आणि रोखीने होत असल्याने आणि शासकीय दुर्लक्ष असल्याने व मोठ्या प्रमा णात शासनाचा कर बुडवून केला जात आहे.
      
वीटभट्टीचा कच्चा माल,माती आणि वीट वाहतूक करीत असताना ती सुरक्षेच्या दृष्टीने झाकलेली असावीत,मात्र भर दिवसा ती वाहतूक राजरोसपणे उघडी ठेवून केली जात आहे. तसेच अस्तित्वात असलेल्या वीटभट्टी पासून कमीत कमी एक किलोमीटर अंतरावर असावी, तसेच भट्टीला मान्यता प्राप्त इंधन वापरावे, तिला चिमणीची उंची ठरवून दिली आहे,वस्ती, फळबागा यांच्यापासून दूर अंतरा वर असावी, असे एक ना अनेक नियम धाब्यावर बसवून वीटभट्टया सुरू आहेत.सध्यातरी या प्रकरणावर शासकीय यंत्रणा हलताना दिसत आहे, मात्र त्यात कितपत यश येईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.