बारामतीची कृषीपंढरी गजबजली; आ. सुरेश धस यांनी दिली भेट : परराज्यातील हजारो शेतकऱ्यांचीही गर्दी
शनिवार, १८ जानेवारी, २०२५
Edit
बारामती:- बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित कृषिक या दहाव्या कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरातून विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातूनही हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली.पुरुष शेतकऱ्यांचे बरो बरच महिला आणि युवक,युवतीं ची संख्या यामध्ये लक्षणीय होती,हे विशेष उल्लेखनीय.
राज्यभरातून शुक्रवारी दि. १७ रोजी सकाळी आठ वाजल्या पासूनच आलेल्या वाहनांनी येथील परिसर गजबजून गेला होता.या प्रदर्शनाला भाजपचे आमदार सुरेश धस तसेच कोल्हापूरच्या संयोगिताराजे छत्रपती, माजी मात्री अनिल देशमुख यांनी भेट दिली.यावेळी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार व विश्वस्त सुनंदा पवार यांनी त्यांना अधिक माहिती दिली.
कृषिक प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही भेट दिली. होमिओपॅथी औषधावर आधारित आणि लुप्त होत चाललेल्या देशी वाणांना पुनर्जीवित करण्यासाठी घेतलेल्या तब्बल ५८ प्रकारची पिके पाहत शेतकऱ्यांनी आवर्जून याची माहिती घेतली. पिकावर कोणत्याही प्रकारचा रासायनिक प्रादुर्भाव न करणारी होमिओपॅथिक औषधे भविष्या तील शेतीसाठी उपयोगी पडतील याची खूणगाठ बांधत त्या औषधांचे प्रमाण आणि औषधांची माहिती शेतकरी आवर्जून घेत असतांना दिसून आले.
राशी कापूस पिकाची पाहणी
विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाची शेती सर्वाधिक असल्याने या शेतीशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात उत्पादित केलेल्या राशी या जातीच्या कापूस पिकाची पाहणी केली.त्याच बरो बर कापूस पिकामध्ये यांत्रिकी करणाची युग आणल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शक तो हा विश्वास देखील याठिकाणी नाशिकच्या किशोर वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दाखवलेल्या प्रात्यक्षिकातून आला.
◼️ ११ कोटींचा सोनेरी मारवाडी घोडा
पशुप्रदर्शनाचे स्वतंत्र दालन असलेल्या या या प्रदर्शनात हैदराबादच्या हसन बिन त्रीप यांनी आणलेला ११ कोटींचा सोनेरी मारवाडी घोडा तसेच नांदेडच्या मालेगाव तालुक्यातील लोहा तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांनी आणलेल्या राम व रावण या लाल कंधारी जातीच्या बैलांची जोडी तसेच माणसाळलेली व माणसाला मुका देणारे सोन्या, मोन्या बैल शेतकरी आवर्जून पाहत होते.
◼️ कृषि प्रदर्शन उत्तम
कृषी प्रदर्शनाचे ठिकाण उत्तम आहे. प्रदर्शन ठिकाणचे प्लॉट वरील मार्गदर्शन नाविन्य आणि प्रदर्शन दर्जा उत्तम आहे, ऊसातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॉट आवडले.
▪️सुरेश मोते
- शेतकरी,नेवासा जि. अहिल्यानगर
◼️ आर्टिफिशल इंटेलिजन्स
या वेळच्या प्रदर्शानाचे वैशिष्ट्य ठरलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित ऊसाच्या शेतीवरती सर्वाधिक गर्दी शेतकऱ्यांनी केली
होती. या ठिकाणी उसाच्या विविध जाती कशाप्रकारे वाढलेल्या आहेत आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स हे तंत्र नेमके कसे काम करते हे शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाणून घेतले