दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिन साजरा

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिन साजरा

 

साप्ता.कऱ्हावार्ता-लोकवार्ता कार्यालयात ४० वर्षांपासून आयोजन
बारामती:- ६ जानेवारी रोजी आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिना निमित्त पत्रकार दिन साप्ताहिक लोकवार्ता/कऱ्हावार्ता कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. गेले ४० वर्षांपासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे.

कार्यक्रमाची सुरुवात आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महिला संपादिका सीमा चोपडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार-संपादक दत्ता महाडीक,तैनूर शेख,संतोष शिंदे,स्वप्निल कांबळे,सुनील शिंदे,दशरथ मांढरे,उमेश दुबे,आनंद धोंगडे,श्री.पांढरे आणि महिला संपादिका सीमा चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडीक, संपादक संतोष शिंदे, तैनूर शेख, स्वप्निल कांबळे, आणि सुनील शिंदे,आनंद धोंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत पत्रकार दिनाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच दत्ता महाडीक यांनी पत्रकार,समाज रचना आणि व्यावसायिकता याबाबत मार्गदर्शन केले.आणि सर्वांनाच शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे समारोप उमेश दुबे यांनी आभार प्रदर्शनाने केला.कार्यक्रमानंतर चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.

ज्येष्ठ पत्रकार-संपादक दत्ता महाडीक यांच्या साप्ताहिक लोकवार्ता/कऱ्हावार्ता कार्यालय येथे संपादक आणि पत्रकारांनी एकत्र येत बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मृतिदिनानिमित्त त्यांचे कार्य आणि पत्रकारितेचे योगदान याबाबत चर्चा केली.सालाबाद प्रमाणे यंदाही हा कार्यक्रम पत्रकारांच्या एकत्रित सहभागाने यशस्वी झाला.