
कर्करोग(कॅन्सर)तपासणी शिबीरात बारामती तालुक्यात ३५५ महिलांची तपासणी
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
Edit
बारामती :- जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी मोहिमेत काटेवाडी येथे आयोजित शिबीरात १२, पणदरे ५६, मोरगाव १६५ आणि सुपा येथे १२२ असे एकूण ३५५ महिलांची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
यामधे संशयित मुख कर्करोग २४८ स्तन कर्करोग ४० गर्भाशय मुख कर्करोग ६७ असे ३५५ संश यित महिलांची तपासणी केलेली असून त्यांची पुढील तपासणी व निदान झाल्यावर त्यांच्यावर मोफत उपचार शासनामार्फत करण्यात येणार आहेत,अशी माहिती डॉ.मनोज खोमणे यांनी दिली.