लोकशाही दिनात एकूण ८ अर्ज प्राप्त-तहसीलदार शिंदे

लोकशाही दिनात एकूण ८ अर्ज प्राप्त-तहसीलदार शिंदे

 

बारामती :- नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याचे अनुषंगाने तहसील कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात सोमवार १७ रोजी नागरिकांचे कडून एकूण ८ अर्ज स्विकारण्यात आले आहेत,प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. 

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय नलावडे, सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे,तालुका कृषीअधिकारी सुप्रिया बांदल,सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज नवसरे,बारामती शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके,वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यात येणार असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन श्री.शिंदे यांनी  केले आहे.