शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन व शव शीतगृहाची सुविधा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन व शव शीतगृहाची सुविधा

 


बारामती दि.५ :- येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामध्ये शवविच्छेदन व शवशीतगृहाची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के आणि न्याय वैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभाग  प्रमुख तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.अमोल शिंदे यांनी दिली. 
     
महाविद्यालयाचे परिसरातील सर्व सुविधानीयुक्त सुसज्ज शव चिकित्सा इमारत उभारण्यात आली असून या इमारतीमध्ये शवचिकित्सा व विद्यार्थीप्रशिक्षण विषयक कामकाज करण्यात येणार आहे.शवचिकित्सागृहा मध्ये शीतगृह तयार करण्यात आले असून एकाचवेळी साधारण ४ मृतदेह ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे,अशी माहिती डॉ.शिंदे यांनी दिली आहे.