बारामतीच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत यश

बारामतीच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत यश

 

बारामती :- पुणे शहर बॉक्सिंग संघटना आयोजित एक दिवसीय भव्य जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये नॉकआउट बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध वजन व वयोगटात यश संपादन केले.

◼️शिवराजे हिम्मत कौले - गोल्ड मेडल

◼️भार्गव विजय मचाले - गोल्ड मेडल

▪️आर्या ओंकार सिताप - सिल्वर मेडल

▪️राजवर्धन गणेश सिताप-सिल्वर मेडल

▪️अली इम्रान पठाण - सिल्वर मेडल

सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन बारामती बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. हिम्मत कौले यांनी केले आहे.हे सर्व खेळाडू जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी श्री.अमर भंडलकर सर मो.नं. ९८८१७९०१८९ यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग शिकत आहेत.

यातील शिवराज कौले या खेळाडूची शासकीय खेळाडू व क्रीडा अकॅडमी बळकटीकरणा साठीची योजना मिशन लक्षवेध साठी निवड झालेली आहे त्याने शालेय राज्यस्तरिय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे.सर्व खेळाडूंचे बारामतीच्या विविध क्षेत्रामधून कौतुक केले जात आहे.