
बारामतीचे काॅईन मॅन राकेश शहाणे संग्रहातील अमुल्य शिवकालीन नाणी व चलनी नोटांचे प्रदर्शन; नटराज नाट्य कलामंदिरात शनिवारपासून पहा
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५
Edit
बारामती :- येथील बारामतीचे प्रसिद्ध काॅईन मॅन राकेश शहाणे यांचे संग्रहातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एसके हॉबी वर्ल्ड यांच्या वतीने नटराज नाट्य कला मंदिरात २ हजार वर्षे पूर्वीपासून ची तसेच शिवकालीन,ब्रिटिश कालीन आणि देशी परदेशी दुर्मिळ नाणी,प्लास्टिकचे पहिले नाणे व नोटांचे,पोस्टाचे तिकीटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार दि.८ ते १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत नाममात्र शुल्क आकारून हे प्रदर्शन सुरु असेल. या प्रदर्शनात हिंदवी स्वराज्याचे पहिले नाणे,शिवकालीन नाणी, दुर्मिळ पुरातन नाणी, ब्रिटिश कालीन नाणी व चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे तसंच दोनशे देशातील नाणी व नोटा येथे पाहावयास मिळतील.