बारामतीत १७ फेब्रुवारीला १२ वाजतां लोकशाही दिनाचे आयोजन

बारामतीत १७ फेब्रुवारीला १२ वाजतां लोकशाही दिनाचे आयोजन


 बारामती  :- नागरिकांच्या शासनाच्या विविध विभागा कडील अडचणी दूर करण्या सोबतच त्यांच्या प्रलंबित असणाऱ्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार,१७ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथे दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.  

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न विहित मुदतीत सुटले तर नागरीकांचे जिल्हा स्तरावर येण्याचे प्रमाण घटून त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होते. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. त्याअंतर्गत राज्याच्या प्रशासनात १०० दिवसात प्राधान्याने करावयाच्या बाबींबाबत सविस्तर जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचना दिल्या आहेत,नागरिकांचे प्रश्न तालुका स्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती,दावे या लोकशाही  दिनात मांडाव्यात,असे आवाहन तहसीलदार श्री.शिंदे यांनी केले आहे.