शेगाव येथे संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सवास प्रारंभ; राज्यातील भजनी दिंड्यांचे आगमन

शेगाव येथे संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सवास प्रारंभ; राज्यातील भजनी दिंड्यांचे आगमन

 

शेगाव :- येत्या गुरुवार दि.२० रोजी संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन सोहळा असून या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. प्रगट दिन उत्सवाला प्रारंभ झाला आहे.यंदा संत गजानन गजानन महाराजांचा १४७ वा प्रगटदिन उत्सव असून यानिमित्त गुरुवार दि.१३ रोजी) सकाळी११ वाजता श्री महारूद्र स्वाहाकार यागाने उत्सवास प्रारंभ झाला. राज्यभरातून भजनी दिंड्या, पालख्यांचे आगमन होण्यास सुरवात झाली आहे.

श्री. महारूद्र स्वाहाकार यागा निमित्त श्रींच्या मंदिर परिसरात सजावट करण्यात आली.प्रगट दिना निमित्त दररोज पहाटे ५ते६ काकडा,७:१५ ते९:१५भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन,सायंकाळी ५:३० ते ६ हरिपाठ,रात्री ८ ते १० कीर्तन होणार आहे.शनिवारी(दि. १५) हरिभक्त पारायण प्रशांत बुवा ताकोते (सिरसोली)रविवारी (दि.१६) अनंत महाराज बिडवे (बार्शी),सोमवारी (दि.१७) राम डोंगरे महाराज(जाटनांदूर),मंगळ वारी(दि.१८)मयूर बोडखेमहाराज (श्री क्षेत्र देहू) बुधवारी (दि.१९) श्रीहरी वैणव महाराज (जालना), गुरुवारी (दि.२०)श्रीराम ठाकूर (लातूर)यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. 

गुरुवारी संत गजानन महाराज  प्रगटदिन असल्याने या दिवशी सकाळी १० ते १२ हरिभक्त पारायण भरत पाटील महाराज (मु.म्हैसवाडी) यांचे 'शेगावी श्रींच्या प्रागट्टया' निमित्त कीर्तन होईल. या दिवशी सकाळी १० वाजता श्री महारूद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती, अवभृतस्नान होईल. दुपारी ४ वाजता पालखी अश्व,रथ,मेण्यासह परिक्रमासाठी निघेल.यावेळी राज्यभरातून लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.शुक्रवारी (दि.२१) सकाळी ७ ते ८काल्याचे कीर्तन श्रीराम ठाकरे (मु.लातूर) यांचे असेल, त्यानंतर उत्सवाची सांगता होईल. या उत्सवामुळे संतनगरीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.