
बारामती एसटी बसस्थानकात रात्री मुक्कामी बसमध्ये चोरी
बारामती :- येथील बारामती एसटी बस स्थानकात मुक्कामी असलेल्या हळीयाळ ते बारामती या बसमधील कंडक्टरचे दहा हजार रुपये रोख रक्कम व १६ हजार रुपये रकमेची वस्तू चोरीला गेले असल्याची तक्रार कंडक्टर केमपन्ना काडप्पा कुंभार यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला दिलेली आहे.
भारतीय न्याय संहिता (बी एन एस )२०२३ कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती येथे सदरील बस मुक्कामासाठी आलेली असतांना रात्री साडेअकरा वाजता कुंभार झोपले नंतर बसच्या काचा उघडून बसच्या सीटवरील बॅग, पत्र्याची बॅग व त्यामधील रोख रक्कम दहा हजार व इतर साहित्य चोरट्याने घेऊन पळ काढला आहे. सकाळी उठल्यानंतर कुंभार यांच्या लक्षात ही चोरी उघडकीस आली यामध्ये दहा हजार रुपये रोख रक्कम, पंधरा हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक मशीन, १हजार रुपये किमतीचा लोखंडी पत्रा तिकीट बॉक्स व एक रुपये दोन रुपये पाच रुपये आठ रुपये अकरा रुपये नऊ रुपये १४ रुपये अठरा रुपये पन्नास रुपये ६० रुपये १०० रुपये व दीडशे रुपये दराची तिकिटे दोनशे रुपये दराची तिकिटे चोरीला गेले आहेत बस नंबर के ए एफ ३४२९ तिचे आतील प्रवासी सीटवर ठेवलेली लोखंडी पेटी, तिकीट मशीन बॉक्स रोख रक्कम व एसटीचे मार्गस्थ तिकिटे असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरीला गेलेली आहे.सदर चोरीचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील हवालदार सुप्रिया तानाजी गोरे या करीत आहेत.