माळेगाव इंजिनिअर कॉलेज ते राजहंस चौक सर्व्हिस रोड होणार - खा.सुप्रिया सुळे

माळेगाव इंजिनिअर कॉलेज ते राजहंस चौक सर्व्हिस रोड होणार - खा.सुप्रिया सुळे

 

बारामती :- माळेगांव शहराला भेडसावणाऱ्या अनेक समस्या निर्माण झाल्या असून या समस्या तातडीने मार्गी लागाव्या यासाठी खा.सुप्रिया सुळे यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप आढाव यांनी दिली असून लवकरच या समस्या   दुर करण्याचे आश्वासन खा. सुप्रिया सुळे यांनी दिले.

बारामती उपविभागाचे  प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या दालनात खा.सुप्रिया सुळे यांच्या सोबत ही चर्चा करण्यात आली.

यावेळी माळेगांवमधील पुढील समस्यांचे बाबत चर्चा झाली.

१) निरा-बारामती राज्य रस्त्याचे इंजिनिअर कॉलेज ते शारदा नगर असे चौपदरीकरणाचे काम झाले असून या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात,वहातुक कोंडी होत असल्याने नागरिक प्रवासी शालेय विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

  २) इंजिनिअर कॉलेज ते राजहंस चौक या भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पंक्चर (बोगदे) ठेवल्याने या ठिकाणी सतत अपघात होत असुन अपघातास हे बोगदे कारणीभूत असुन ते बंद करणे.

३) इंजिनिअर कॉलेज ते राजहंस चौकापर्यंत सर्व्हिस रोड तातडीने करणे.सर्व्हिस रोड तयार केल्यास मुख्य रस्त्यावरील वहातुक कमी होऊन अपघात टळु शकतात.तसेच सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी दोन्ही बाजुचे अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे.

४) माळेगांव परिसर मोठा असुन शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. माळेगाव,माळेगांव खुर्द, येळे वस्ती,पाहुणेवाडी गावांसाठी एकच तलाठी असुन त्यांना इतर गावाचा अतिरिक्त पदभार  दिल्याने ग्रामस्थ,शेतकरी, विद्यार्थी यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.त्यांंना ७/१२ उतारे,तउत्पन्न दाखले व इतर कामांसाठी ताटकळत बसावे लागते.यामुळे आणखी एका तलाठ्याची नेमणूक आवश्यक आहे.यामुळे गतीमान कामकाज होऊ शकते.

५) माळेगांव प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात असलेल्या कंत्राटी कामगार यांचे पगार ४-५ महिने झाले तरी मिळाले नाहित.संबधीत कामाचा ठेका घेतलेले ठेकेदार मनमानी करत आहे.यासाठी जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचना देऊन वेळेत पगार होण्या साठी पाठपुरावा केला पाहिजे.

 दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील कार्यालयात या समस्ये बाबत स्विय सहायक सचीन यादव, बाळराजे मुळीक, नितीन हाटे यांच्या सोबत पत्रव्यवहार केला असून त्यांनीही दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संबंधित पत्र पाठवले आहे.तर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे व माजी अध्यक्ष, जिल्हा बँक संचालक संभाजी होळकर यांनी सदर समस्या जाणून घेतल्या.