बारामती न्यायालयात कर्तृत्ववान महिला वकिलांचा सन्मान

बारामती न्यायालयात कर्तृत्ववान महिला वकिलांचा सन्मान

 


बारामती:- बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात महिला दिनानिमित्त वकील संघटनेतील महिलांकडून वकिली क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिला वकिलांचा गौरव करण्यात आले. ॲड. सुवर्णा संतीकर,ॲड.स्नेहल नाईक,ॲड.नयनतारा काळे, ॲड.नीलिमा गुजर यांचा वकील संघटनेच्या उपाध्यक्षा ॲड.प्रीती शिंदे-निंबाळकर यांनी नारीशक्ती पुरस्कार देत सन्मान केला.    

जागतिक महिला दिनानिमित दिल्ली येथे झालेल्या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या ॲड.सीमा मोने-लोंढे,ॲड.कांचन देवकाते, ॲड.राधिका कुंभार यांचाही सत्कार पार पडला.न्यायसंस्थेची प्रतिमा आणि प्रतिभावान महिलांचे फोटो असलेला केक कापून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला.      

ॲड.सीमा मोने-लोंढे व कुंभार यांनी दिल्लीतील परिषदेचे अनुभव कथन केले.ॲड.प्रीती शिंदे-निंबाळकर,ॲड.शकिला आत्तार,ॲड.सोनाली मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ॲड. वृषाली बांदल यांनी केले. सूत्रसंचालन ॲड.अपूर्वा डोंबे यांनी केले.तसेच ॲड. स्नेहा भापकर यांनी आभार मानले.