
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज ६६ वा अमृत बीज उत्सव सोहळा मोठ्या उत्सहात; लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे बीजे निमित्त फुलाचे कीर्तन
डोर्लेवाडी (प्रतिनिधी) :- जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज ६६ वा अमृत बीज उत्सव सोहळा डोर्लेवाडी येथे मोठ्या आनंदात व उत्सहात साजरा करण्यात आला.प्रती देहू समजल्या जाणाऱ्या डोर्लेवाडीत पार पडला.
आरती तुकारामा! स्वामी सद्गुरू धामा !!
सच्चिदानंद मूर्ती!पाय दाखवा आम्हा !!
यंदाचे बीज सोहळ्याचे ६६ वे वर्षे आहे. या निमित्ताने यावेळी मंदिरात टाळ मृदंगाच्या तालात अखंड हरिनामाचा गजर सुरु झाला...अन पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा जयघोष होताच उपस्थित हजारो भाविकांनी जड अंतकरणाने श्रींच्या मूर्तीवर गुलाल पुष्प वर्षाव करून संत तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला.प्रती देहू समजल्या जाणाऱ्या येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात लाखो भाविकांनी याचीदेही याचीडोळा' बीजेचा सोहळा अनुभवला.
देवस्थान समिती व सांप्रदा यिक भजनी मंडळाच्या वतीने बीज उत्सव सोहळ्यानिमित्त आठ दिवसांपासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.पहाटेच मंदीरात आक र्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी महाभिषेक झाल्यानंतर बाळासाहेब नाळे महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे बीजे निमित्त फुलाचे कीर्तन झाले.कीर्तनात त्यांनी संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र व त्यांनी समाजासाठी केलेल्या अलौकिक कार्याचे वर्णन केले.दुपारी १२ वाजता अखंड हरिनामाचा गजर झाला. त्याच बरोबर अत्यंत जड अंतकरणाने भाविकांनी गुलाल व पुष्प वर्षाव करून बीजेचा सोहळा साजरा केला.
पुणे,सातारा,सोलापूर जिल्ह्यातून लाखो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण मंदीर परिसरात भव्य मंडप टाकण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, तसेच शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती.
बारामती शहर पोलीसांच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. सामाजिक संस्था व स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
संसदरत्न खा.सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांनी तुकाराम बीजेच्या निमित्तानं कार्यक्रमाला हजेरी लावली.जवळजवळ सुप्रिया सुळे या एक तास कीर्तानामध्ये दंग झाल्या होत्या यावेळी कीर्तानाचा आनंद घेतला.
दरम्यान, येथील यात्रेला पै- पाहुणे,माहेरवासीनी दरवर्षी आवर्जून येतात.मंदिरात दर्शनासह यात्रेचा आनंद कुटुंबासह लुटतात. गावात अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम एकत्र नांदत असल्याने यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते.