पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठलाग करीत सव्वा लाखाचे दागिने लंपास

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठलाग करीत सव्वा लाखाचे दागिने लंपास

 

बारामती:- येथील निरा डावा कालव्याच्या भरावावरून पांयी जाणाऱ्या महिलेला पत्ता विचारण्याचा बहाणा करत त्यांच्याकडील १ लाख ३० हजार रुपयांचे दागिने एका अज्ञात चोरट्याने हिसकावून लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मंगला जयप्रकाश किर्वे(रा.वसुंधरा बंगलो टी.सी. कॉलेज रोड बारामती) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.रविवारी दि.९ मार्चला ही घटना घडली. फिर्यादी या दररोज कालव्याचे भरावावर चालण्यास जात असतात.घटनेच्या दिवशी त्या नटराज नाट्य कला मंदिरा शेजारील कालव्यावर फिरण्या साठी गेल्या.सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्या सरगम क्लासेस जवळून जात असतांना दुचाकीवरून एक युवक आला. त्याने हाक मारून फिर्यादी यांना थांबविले.शाहू हायस्कूल कुठे आहे अशी विचारणा त्याने केली. फिर्यादीने त्याला माहिती दिली.      

त्यानंतर तो दुचाकीस्वार शाहू हायस्कूलकडे न जाता त्यांच्या पाठीमागे गेला.त्यामुळे फिर्यादी एका बंगल्याजवळ जाऊन थांबल्या.तो दूर गेल्याची खात्री झाल्यावर त्या तेथून निघून घराकडे जात होत्या.त्यावेळी तो पुन्हा त्यांच्याजवळ आला.गाडी वरून उतरून त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. यावेळी दोघांमध्ये झटापटही झाली.घडलेल्या घटनेनंतर फिर्यादी भयभीत झाल्याने त्यांनी उशिरा फिर्याद दाखल केली आहे.शहर पोलिस ठाण्यातील पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.