
राज्यसभेच्या खासदार मा. श्रीमती सुनेत्रा पवार यांनी घेतली उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती मा. श्री. जगदीश धनखड यांची सदिच्छा भेट
बुधवार, २६ मार्च, २०२५
Edit
बारामती:- राज्यसभेच्या खासदार माननीय श्रीमती सुनेत्रा पवार यांनी मेक्सिको दौऱ्यावरून परतल्यानंतर आज उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती मा. श्री. जगदीश धनखड यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत उपराष्ट्रपतींनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहभागाचे कौतुक करत, “तुम्ही जागतिक पातळीवर देशाचे प्रतिनिधित्त्व प्रभावीपणे केले, ही अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार काढले.
या वेळी केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. प्रल्हाद जोशी, मा. खा. श्री. मनोज कुमार आणि मा. श्री. मिलिंद देवरा उपस्थित होते. त्यांनीही मा. सुनेत्रा पवार यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
राज्यसभेत पदार्पण केल्यानंतरचा हा त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा ठरला. या दौऱ्याने महिलांसाठी जागतिक व्यासपीठावर आपले मत मांडण्याची संधी दिली आणि देशाच्या प्रगतीसाठी नव्या संधी शोधण्याची जाणीव करून दिली. जागतिक स्तरावर भारतीय नेतृत्व अधिक दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून हा अनुभव मा. सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या पुढील कार्यात दिशा देणारा ठरेल, हे नक्की.