प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाचे काम खुच खडतर आणि कौतुकास्पद -- लुसी कुरियन दिदी

प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाचे काम खुच खडतर आणि कौतुकास्पद -- लुसी कुरियन दिदी

 

बारामती:- तालुक्यातील सुपे येथील जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयातर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत माहेर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सिस्टर लुसी कुरियन, (दीदी) यांना जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तीमत्वांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर नाव असल्याबद्दल व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी कुरीयन दीदी बोलत होत्या.मला जो ॲवार्ड मिळतो, तो माझा एकटीचा नसून तो माझ्या सर्व फिल्डवर काम करणाऱ्या स्टाफचा व देणेदारांचा आहे. त्यांच्यामुळेच हे शक्य आहे. मला मिळालेला प्रत्येक ॲवार्ड सन्मान मला व माझ्या स्टाफला प्रेरणा देणारा असतो. माहेर संस्थेमध्ये निराधार,शोषित, पिडीत,अन्याय झालेले,निराधार, आश्रय नसणारे, रोडवर भीक मागणारे,ज्यांना कोणीही नाही असे लोक आश्रित आहेत.या लोकांसाठी माहेरच त्यांचे घर आहे. माहेर संस्थेचे कार्य भारता तील सात राज्यांमध्ये चालू आहे. संस्थेतील प्रत्येक मुलावर बोलायचं झालं तर एक पुस्तक लिहू शकतो,अशी भयानक गोष्ट प्रत्येक मुलाची असते.प्रत्येक राज्यात काम करत असतांना पोलिसांचे सहकार्य मिळते.आणि त्यांच्या मार्फतही गरजू लोकांना मदत मिळते व माहेर संस्थेमध्ये पाठवले जाते. 

जीवन साधना फाऊंडेशन संच लित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाचे काम खुप खडतर आणि कौतुकास्पद आहे. विशेष मुलांना निवासी सांभाळणे ही सोपी गोष्ट नाही. या संस्थेच्या कार्याविषयी माहिती घेतली आणि भेट देऊन मनाला खूप छान वाटले.असे मत माहेर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सिस्टर लुसी कुरियन (दीदी) यांनी व्यक्त केले.या प्रसंगी सौ. निताताई बारवकर [मा.सभापती, पंचायत समिती बारामती] स.पो. नि.मनोजकुमार नवसरे [सुपे पोलीस ठाणे प्रमुख] सौ. अल्पाताई भंडारी संस्थापक अध्यक्षा,आभाळ माया ग्रुप बारामती यांची प्रासंगिक भाषणे झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ.निताताई बारवकर, प्रमुख पाहुणे स.पो.नि. मनोजकुमार नवसरे [सुपे पोलीस ठाणे प्रमुख] सौ.अल्पाताई भंडारी संस्थापक अध्यक्षा, आभाळमाया ग्रुप बारामती, परदेशी पाहुणे आमिया मॅडम, रमेश चौधरी सामाजिककार्यकर्ते, शिलानंद अंभोरे अधिक्षक माहेर संस्था,शंकर शेंडगे उपसरपंच ग्रामपंचायत सुपे,सौ.अश्विनीताई सकट,सौ.नयना जगताप ग्रामपंचायत सदस्या, सुपे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे स्वागत जीवन साधना फाऊंडेशन संस्थेचे सचिव डॉ. श्रीप्रसाद वाबळे,खजिनदार दत्तात्रय दरेकर,संचालक अशोक बसाळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी पांडुरंग सुपेकर यांनी केले.संस्थेचे सचिव डॉ.श्रीप्रसाद वाबळे यांनी आभार मानले.