बारामतीत आज पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव मिरवणूक सौहळा; छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने शहर व तालुक्यात विविध कार्यक्रम

बारामतीत आज पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव मिरवणूक सौहळा; छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने शहर व तालुक्यात विविध कार्यक्रम

 

बारामती  :- आज सोमवार  दि.१७ रोजी सकाळी ८:३० वाजता पारंपरिक पद्धतीने शिवछत्रपतींचा भव्य पालखी सोहळा मिरवणुक काढली जाणारआहे.कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यावेळी स्वराज्याचे गुप्तहेर,स्वराज्याचे मावळे रणमर्द शिलेदार,ढोल पथक,वारकरी पथक,हलगी पथक,गजीनृत्य पथक,झांज पथक यांच्या प्रमुख सहभागसह मोठ्या सख्येने शिवप्रेमी नागरिक सामील  असणार आहेत,आपणही सोहळ्यात सहभागी व्हावे असे छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

छत्रपती जन्मोत्सव समितीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजां च्या जीवनाचे आठवडाभरविविध कार्यक्रम आयोजित केले होते. बारामतीत गुरुवार १३ ला छत्र पती शिवाजी महाराजांच्या जीव नातील प्रसंग हे शिवचरित्र नृत्य महोत्सव बीबीडीसी नटराज नाट्यकला मंदिर येथे सादर करणार आले.शुक्रवार दि.१४ मार्च रोजी शिव गीतांचा कार्यक्रम ह.भ.प.अवधुतजी गांधी फत्ते शि कस्त,पावनखिंड,शेर शिवराज चित्रपटातील शिवगीते सादर कर ण्यात आली.महाराष्ट्राचा मराठी बाणा,शिवबा छत्रपती झालं ग फेम शाहीर चंद्रकांत माने यांचा पोवाडा,स्फूर्ती गीतांचा कार्यक्रम शनिवार दि.१५ रोजी सायंकाळी सादर करण्यात आला.भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व शिवचरित्रांवर आधारित भव्य पुस्तक प्रदर्शन तसेच माफक दरात शुक्रवार १४ ते १६ मार्च सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत  विक्री होत होती.