
बारामतीत एन्व्हॉर्यन्मेंटल फोरमतर्फे पाणवठ्यात पाणी; जागतिक जलदिनाचे औचित्य साधून उपक्रम
![]() |
तांदूळवाडी येथील वनक्षेत्रातील पाणवठ्यात पाणी सोडतांना एन्व्हॉर्यन्मेंटल फोरम ऑफ इंडियाचे सदस्य |
बारामती:- वनविभागातील प्राण्यांचे ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी हाल होऊ नयेत या उद्देशाने येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार दि. २१ मार्च पासून पाणवठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे.
जागतिक वनीकरण दिन, जागतिक जलदिन व जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम एन्व्हॉर्यन्मेंटल फोरम च्या वतीने राबविण्यात आला. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आता वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लाग ला आहे.यावर मात करण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणेच बारामती तील एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवांसाठी टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे.या उपक्रमां तर्गत शुक्रवारी तांदूळवाडी नजीकच्या दोन पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले.
बारामती तालुक्याच्या वन विभागात पारवडी,शिर्सुफळ, नारोळी,वढाणे,मोढवे,मुढाळे, साबळेवाडी आदी ठिकाणी सुमारे १९ पाणवठे आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात फोरमच्या वतीने या पाणवठ्यात टँकरने पाणी सोडले जाते.यंदाही आव श्यकते नुसार वनविभागाच्या सूचनांनुसार यात उन्हाळ्यात पाणी सोडले जाणार आहे.