बारामती सहकारी बँकेची ऐतिहासिक कामगिरी ; ७१ कोटींचा नफा; सभासद वर्गाच्या विश्वासास पात्र बँक

बारामती सहकारी बँकेची ऐतिहासिक कामगिरी ; ७१ कोटींचा नफा; सभासद वर्गाच्या विश्वासास पात्र बँक

 

बारामती:- येथील बारामती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२५ अखेर ३५७७ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय करीत ७१ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.बँकेच्या ढोबळ नफ्यात विक्रमी वाढ झाली असून, सर्व वैधानिक तरतुदी पूर्ण करत ११.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवण्यात बँकेला यश आले आहे.देशातील टाॅप १० नागरी सहकारी बँकांमध्ये स्थान  मिळवण्याच मानस व उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

३१ मार्च २०२५ अखेर बँकेची आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे एकूण व्यवसाय: ३५७७ कोटी रुपये असून ढोबळ नफा: ७१.०० कोटी रुपये झाला असून निव्वळ नफा ११.६३ कोटी रुपये  प्राप्त झाला असून बँकेची सतत प्रगती होत आहे.

🔸बँकेच्या भविष्यातील धोरणात्मक उद्दिष्टे

🔸देशातील टॉप १० नागरी सहकारी बँकांमध्ये स्थान मिळवणेव सभासदांना सर्वोत्तम बँकिंग सेवा पुरवणे.बँकेचे कार्य क्षेत्र विस्तारित करणे आणि नव्या शाखा सुरू करणे हा एक धोरणात्मक हेतू साध्य करण्यास प्राधान्य देत आहोत.

डिजिटलायझेशनद्वारे अत्याधुनिक सेवा प्रदान करणे.जलद व सुरक्षित व्यवहार सुनिश्चित करणे.विविध कर्ज योजना राबवून कर्जवाटपाचा विस्तार करणे.नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्राहकांची प्राधान्याने सोय करणे.व सभासदांच्या आर्थिक गरजांनुसार विशेष उत्पादने सादर करणे असा आहे..

अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांची मेहनत हा या बँकेत यशाचा गाभा आहे.

बँकेच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार व राज्यसभा सदस्या तालीकाप्रमुख खा.सौ.सुनेत्रा पवार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याने बँकेचा विकास आणि प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे, असे अध्यक्ष सचिन सातव यांनी यावेळी सांगितले.

बँकेच्या या उज्वल यशा मागे व्यवस्थापन मंडळाचा ठाम विश्वास व कर्मचाऱ्यांची अविरत मेहनत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा देण्याच्या बँकेच्या धोरणामुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली.सभासदांचा विश्वास हीच बँकेच्या यशाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

संचालक मंडळ व कर्मचार्‍यांचे योगदान

बँकेच्या ऐतिहासिक यशाबद्दल अध्यक्ष आणि संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले असून, सर्व ग्राहक, कर्जदार, ठेवीदार आणि भागधारकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या यशामध्ये उपाध्यक्ष विजयराव गालिंदे, तज्ञ संचालक प्रितम पहाडे (सी.ए.), अॅड. शिरीष कुलकर्णी (अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ), संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, देवेंद्र शिर्के, उद्धव गावडे, नामदेवराव तुपे, जयंत किकले, रणजित धुमाळ, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, सौ. नुपूर शहा, डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. अमोल गोजे, अॅड. रमेश गानबोटे, शांताराम भालेराव, कार्यकारी संचालक रविंद्र बनकर, मुख्य सरव्यवस्थापक विनोद रावळ तसेच सर्व कर्मचारीवृंद यांनी मोलाचे योगदान दिले आहे.