
पंधरा वर्षाच्या विद्यार्थिनीवर तीन वर्षे लॉजवर नेऊन बलात्कार; करंजे गावच्या विश्वराज प्रताप गायकवाडवर पोस्कोचा गुन्हा दाखल
बारामती:- दहावीच्या वर्गात शिकत असताना जबरदस्तीने मैत्री करून वेगवेगळ्या लॉजवर नेऊन दोन वर्षे जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले व आक्षेपार्ह फोटो आईवडीलांना पाठवले. या कारणावरून सोमेश्वर नजीकच्या करंजे येथील पृथ्वीराज प्रताप गायकवाड याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कायदा 1860 चे कलम 354 (अ), 354(ड), 354, 376, 2 (एन), 506, सह पोस्को 4, 8,12 या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा 10 मार्च 2022 ते 30 एप्रिल मार्च 2025 दरम्यान बारामती तालुक्यातील करंजे, करंजे पूल येथील कन्हैया स्वीट होम व निरा लोणंद रोड लगतच्या लॉजवर वेळोवेळी घडला.
विद्यार्थिनी करंजेपूल परिसरातील एका शाळेमध्ये सन 2022 मध्ये दहावी इयत्तेत शिकत असताना आरोपी हा शाळेत येत असताना जबरदस्तीने मैत्री करून जबरदस्ती बोलायचा. कंरजेपुल येथील खासगी क्लासला जात येत असताना 10 मार्च 2022 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विश्वराज प्रताप गायकवाड याने पिडीत मुलीला, तू मला खुप आवडते. माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे असे म्हणुन प्रपोज केलं.
त्यास मुलीने नकार दिला असता, आपली मैत्री आहे. तुझे बाबा काही एक विचार करीत नाहीत असे सांगत 12 मार्च 2022 ते 25 मार्च 2022 दरम्यान मुलीचे वय 15 वर्ष असताना कन्हैया स्विटहोम कंरजेपुल येथे आरोपीने स्कूटी मोटार सायकलवर येऊन जबरस्तीने कॉफी पिण्यासाठी जबरस्तीने स्कुटी मोटार सायकलवर बसवून निरा लोणंद रोड लगत असलेल्या एका लॉजवरील रूम मध्ये नेले. फिर्यादीच्या इच्छेविरूध दोन वेळा शरीरसंबध केले व त्यानंतर सदर प्रकार कोणास सांगू नको अशी धमकी देऊन कंरजेपुल येथे सोडले.
पुन्हा दोन दिवसानी त्याच लॉजवर नेऊन इच्छेविरूध शरीरसंबध केले. त्यानंतर पिडीत मुलगी एम एस के काँलेज मध्ये मी इयत्ता 11 वी सायन्समध्ये शिकत असताना ती 17 वर्षाची असताना काँलेजच्या गँदरिंगच्या वेळी त्याने जबदस्तीने हातात ओढून त्याचेसोबत त्याचे मोबाईलमध्ये एकत्रित फोटो काढले.
त्यानंतर 5 जून 2023मध्ये तसेच सन 2024 व 2025 मध्ये नेट परीक्षाची तयारी करण्याकरता लातूर येथे असताना त्याने त्याच्या मोबाईलवरुन वेळोवेळी फोन करून तू मला भेट असे म्हटले व शरीरसुखाची मागणी केली. त्यास नकार दिला म्हणून लॉजवर जबरस्तीने नेऊन मी तुझे नकळत काढलेले न्युड फोटो वायरल करणार अशी धमकी दिली, त्यानंतर मुलीच्या आईच्या मोबाईलवर दोघांची त्याच्या मोबाईलमध्ये काढलेली सेल्फी फोटो पाठविले.