बिल्डर असोसिएशनच्या शाखाध्यक्षपदी साहिल खत्री; कार्यकारिणी जाहीर-उपा ध्यक्ष घिमान,सेक्रेटरी वडुजकर, जितेंद्रजाधव

बिल्डर असोसिएशनच्या शाखाध्यक्षपदी साहिल खत्री; कार्यकारिणी जाहीर-उपा ध्यक्ष घिमान,सेक्रेटरी वडुजकर, जितेंद्रजाधव


बारामती:- बिल्डर असोसि एशन ऑफ इंडिया बारामती सन-२०२५-२६ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया शाखा बारामतीच्या अध्यक्षपदी साहिल खत्री यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष घिमान, सेक्रेटरीपदी आदेश वडुजकर, जॉईंट सेक्रेटरीपदी जितेंद्र जाधव, खजिनदारपदी डी.एस. रणवरे यांची एकमताने तर जी. सी. मेंबरपदी संजय संघवी, श्यामराव राऊत यांची बिनविरोध निवड केली.

सन २०२५-२६ वर्षाकरिता बिल्डर्स असोसिएशनतर्फे तालु क्यात विविध प्रकल्प राबविण्या त येणार आहे.बारामतीमथ्ये नाग रिक मोठ्या प्रमाणात घर खरेदी करण्यास पसंती देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माध्यमातून बारामती शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून आतां बारामतीची ओळख झालेली आहे.शासकीय वैद्यकीय महा विद्यालय,आयुर्वेदिक महाविद्या लय,श्रीमंत बाबूजी नाईक वाडा, शिवसृष्टी,वनविभागाचे पर्यटन केंद्र बीज गुणनकेंद्र,विद्या प्रति ष्ठान आदी सुविधा उपलब्ध आहेत. पुरंदरमध्ये होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बारामती शहर व परिसरात नागरिक देखील गुंतवणूक करीत आहेत. 

बिल्डर्स असोसिएशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार शहरात प्रोजेक्ट राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. लवकरच निवड झालेल्या सदस्यांचा पदग्रहण समारंभ उपमुख्यमंत्री पवार, खासदार, तालिकाध्यक्ष सुनेत्रा पवार यांची वेळ घेऊन हा पदग्रहण समारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.बैठकीचे वेळी संस्थेचे किशोर मेहता, मनोज पोतेकर,विक्रांत तांबे, सुभाष जांभळकर, उद्धव गावडे, राजेंद्र खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.